Breaking News

 

 

माळापुडेतील युवकाचा बांद्रेवाडी धरणात बुडून मृत्यू…

बाजार भोगाव (प्रतिनिधी) :  माळापुडे (ता.शाहूवाडी) येथील तुषार तुकाराम सुतार (वय २४) याचा बांद्रेवाडी धरणात आज (शुक्रवार) पोहताना दमछाक झाल्याने बुडून मृत्यू झाला. तो संजीवन (पन्हाळा) येथे इंजिअरिंगच्या शेवटच्या वर्षांत शिकत होता.

तुषार आणि त्याचा लहान भाऊ अक्षय हे दोघे भाऊ आपल्या आईसोबत बांद्रेवाडी धरणाजवळ कपडे धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी हे दोघेजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. पण काही वेळानंतर पोहताना दोघांनाही दमछाक होऊ लागल्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. तिथे कपडे धूत असणारी त्यांची आई व अन्य महिलांनी आरडाओरडा सुरु केली. यावेळी धरणावरून माळापुडे गावातील संजय पाटील जात होते. त्यांनी लगेच पाण्यात उडी  मारुन अक्षय याला पाण्याबाहेर काढले.

नंतर तुषारला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वाचविण्यात अपयश आले. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तुषार हा संजीवनी पन्हाळा येथे इंजिअरिंगच्या शेवटच्या वर्षांत शिकत होता. काल (गुरुवार) तो शेवटचा पेपर देऊन घरी आला होता. मात्र त्याच्यावर काळाने घाला घातला.

3,225 total views, 6 views today

One thought on “माळापुडेतील युवकाचा बांद्रेवाडी धरणात बुडून मृत्यू…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा