Breaking News

 

 

निर्माता अनुराग कश्यपच्या मुलीला ट्विटरवरुन बलात्काराची धमकी…

मुंबई (प्रतिनिधी) :  बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यपच्या मुलीला एका व्यक्तीने ट्विटरवरून रेपची धमकी दिली आहे. याबाबत अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करत याविषयीची माहीती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली.

ट्विटमध्ये लिहिले आहे की, प्रिय मोदीजी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी तुमचे अभिनंदन करतो. पण कृपया मला सांगा अशा फॉलोअर्सचं काय करू जे माझ्या मुलीला अशा प्रकारची धमकी देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत. या ट्विटसोबत अनुरागनं एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात त्याच्या मुलीच्या फोटोवर कमेंट करताना एका व्यक्तीनं अपशब्द वापरले आहेत. 

अनुरागच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला सायबर सेलमध्ये तक्रार करण्याविषयी सुचवलं आहे. तर काहींनी याला अनुरागचा पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.

570 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश