Breaking News

 

 

भारतीय महिला हॉकी संघाने पटकावला दक्षिण कोरिया चषक…

जिनचेऑन (वृत्तसंस्था) : भारतीय महिला हॉकी संघाने मुसंडी मारत दक्षिण कोरियाचा २-१ असा पराभव करून उभय संघांमध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात कोरियाच्या ली सेउंगजूने १९ व्या मिनिटाला केलेल्या मैदानी गोलच्या बळावर कोरियाने आघाडी घेतली. भारतीय कर्णधार राणी रामपालने ३७ व्या मिनिटाला गोल करीत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर नवज्योत कौर हिने ५० व्या मिनिटाला दुसरा मैदानी गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमणावर भर देत पेनल्टी कॉर्नरची कमाई केली, मात्र गोलरक्षकांनी आपापली भूमिका चोख बजावत कोणत्याही संघाला आघाडी घेऊ दिली नाही.

261 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे