Breaking News

 

 

श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी ; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी…

पुणे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामती राखणार, त्यांचं मताधिक्य वाढणार की घटणार का, असे प्रश्न विचारले जात होते. मात्र सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी बारामतीकर ठामपणे उभे राहिले आणि त्यांना मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्याने विजयी केले. आपल्या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या वडिलांसाठी-शरद पवारांसाठी सुप्रिया यांनी भावनिक ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी’, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या मतदारसंघात भाजपने नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या होत्या. भाजपच्या मंत्र्यांनीही सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी मतदारसंघात तळ ठोकला होता. मात्र शरद पवार यांनी इतर मतदारसंघासह बारामतीमध्ये लक्ष केंद्रित केले. सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा महायुतीचे उमेदवार कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आघाडी घेतली होती. मात्र नंतर त्या मोठ्या प्रमाणात पिछाडीवर पडल्या. अखेर सुप्रिया सुळे यांनी १, ५४, ००० मतांनी विजय मिळविला. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांसाठी भावना व्यक्त केल्या.

1,398 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग