जयसिंगपूर : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय येथे सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात झाले.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी शामराव पाटील (यड्रावकर) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले. शिबिरासाठी कोल्हापूर येथील वैभवीलक्ष्मी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या शिबिरा महाविद्यालयातील एकूण ६६ विद्यार्थी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय फलके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी दादासाहेब मगदूम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. शिबिरास संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व  कार्यकारी संचालक अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले.