Breaking News

 

 

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश : दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा खातमा !

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू – काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. गझावत उल हिंद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक झाकीर मुसा याला सुरक्षा दलांच्या जवानांनी  चकमकीत ठार मारले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात गुरुवारी संध्याकाळी चकमक झाली. मुसाच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्य़ात तणावाचे वातावरण असून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

पुलवामा जिल्ह्यामधील ददसारा गावात काही दहशतावादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली. त्यानंतर जवानांनी गुरुवारी संध्याकाळी या भागात शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी झाकीर मुसाचा खात्मा केला.  मुसासोबत या संघटनेचा कमांडर अन्सार याला देखील कंठस्नान घालण्यात आले.

झाकीर मुसा याचे खरे नाव झाकीर राशिद भाट आहे. २०१३ मध्ये पंजाबमधील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामिल झाला. जुलै २०१७ मध्ये हिजबुलचा कमांडर बुरहान वाणी याचा खात्मा झाल्यानंतर मुसा हा हिजबूलचा जम्मू कश्मीरमधील टॉपचा कमांडर झाला होता. गत वर्षी त्याने गझावत उल हिंद ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती.

444 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा