Breaking News

 

 

विधानसभा मतदारसंघ निहाय मंडलिकांचे असे मताधिक्य…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणूकीत कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्यावर विजय मिळवला. त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मोठ्या फरकाने मताधिक्य घेतले. हा देखील औत्सुक्याचा विषय बनला आहे.

प्रा. संजय मंडलिक यांचे अंतिम मताधिक्य तब्बल २ लाख ७० हजार इतके आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आ. हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात ७१ हजार इतके मताधिक्य आहे. चंदगड – गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर या आमदार आहेत. तरीही याठिकाणी ५१ हजारचे मताधिक्य आहे. करवीर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय, असे म्हणत संजय मंडलिक यांना ४३ हजारांचे मताधिक्य दिले आहे. अर्थातच यामध्ये सेना-भाजपाची मते किती हा वेगळा विषय आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघात आ. चंद्रदीप नरके यांच्या विशेष प्रयत्नातून ३७ हजारांचे, राधानगरीमध्ये आ. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून ४० हजारांचे आणि करवीर उत्तरमधून आ. राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे २७ हजार ७०० मताधिक्य आहे. उत्तरमध्ये अर्थातच भाजपाचा वाटा निश्चितच आहे.

480 total views, 3 views today

One thought on “विधानसभा मतदारसंघ निहाय मंडलिकांचे असे मताधिक्य…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा