Breaking News

 

 

धक्कादायक : ‘अमेठी’मधून राहुल गांधी यांचा स्मृती इराणींंकडून पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला. संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अमेठीमधून आपला पराभव झाल्याचे मान्य केले आहे. मात्र अजून मतमोजणी सुरू असून इराणी यांनी गांधी यांचेवर सुमारे २८००० मतांची आघाडी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या पराभव करणाऱ्या स्मृती इराणी या जायंट किलर ठरल्या आहेत.

वास्तविक अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. एकदाही या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झालेला नाही. विरोधी पक्षांनी जंग जंग पछाडूनही काँग्रेसचा पराभव करणे त्यांना जमलेले नाही. मागील निवडणुकीत स्मृती इराणी यांनी त्यांना कडवी लढत दिली होती. या निवडणुकीतही त्यांनी राहुल गांधी यांना कडवी लढतच दिली नव्हे, तर पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. सहाच्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशभरात काँग्रेसचा झालेला पराभव मान्य केला. तसेच अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांचेकडून झालेला पराभवही मान्य केला. स्मृती इराणी यांचे विजयाबद्दल अभिनंदनही केले. त्याचप्रमाणे त्यांनी भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी अभिनंदन केले.  

2,937 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे