Breaking News

 

 

पुन्हा भारत विजयी झाला : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘भारत पुन्हा विजयी झाला’ अशी पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर व्यक्त केली आहे. देशात पुन्हा एकदा मोदीलाट उसळली असून केंद्रात दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतातलं एनडीए सरकार विराजमान होणार, असे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.

‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार. सर्वांना सोबत घेऊन आम्ही देशात भरभराट आणणार. एकजुटीतून आम्ही सशक्त आणि सर्वसमावेशक भारत घडवणार’, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. 

453 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे