मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवारी) मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मलिक यांच्या जामीन न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.

गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कटरचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या संबंधित महिलेने १९९९ या वर्षी मध्ये सलीम पटेल या व्यक्तीच्या नावे पॉवर ऑफ एटर्नी तयार केली होती. यानंतर पटेल याने पॉवर ऑफ एटर्नी गैरवापर करत हसीना पारकरच्या सांगण्याप्रमाणे गोवावाला कंपाउंडची जमीन नवाब मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स कंपनीला विक्री केल्याचा आरोप आहे.

नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जमीन खरेदी ही कायेदेशीर व सर्व नियमांचे पालन करत केल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तपासाला पाच महिने होऊन गेले तरीही आरोपाबाबत सबळ पुरावे समोर आणले नसल्याचे मलिकांकडून सांगण्यात येत आहे; मात्र अजूनही या प्रकरणात त्यांना दिलासा मिळालेला नाही.