Breaking News

 

 

बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती : कोल्हापूरवर भगवा फडकला, संजय मंडलिक ‘खासदार’ झाले !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. कोल्हापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आणि लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र प्रा. संजय मंडलिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मंडलिक यांच्यावर सुमारे दोन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला.

कोल्हापूर मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. त्यामुळे राज्यभरातून निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. आज (गुरुवार) सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यावर टपाली मतांच्या मोजणीपासून प्रा. संजय मंडलिक यांनी आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्रातील मतांच्या मोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच मंडलिक यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनिहाय त्यांची आघाडी वाढत गेली. निकालाचे कल येऊ लागले तसे महाडिक समर्थकांनी मतमोजणी परिसरातून काढता पाय घेतला. तर मंडलिक समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष सुरू केला. अनेक मंडलिक समर्थकांनी आपल्या घराबाहेर मंडलिक यांची छायाचित्रे लावून आणि पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

6,555 total views, 6 views today

4 thoughts on “बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती : कोल्हापूरवर भगवा फडकला, संजय मंडलिक ‘खासदार’ झाले !”

  1. मनःपूर्वक अभिनंदन मंडलीक साहेब. आई श्रीमहालक्ष्मी आपणास उदंड यश प्रदान कर अशी प्रार्थना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash