Breaking News

 

 

मावळमध्ये शरद पवारांचे नातू पराभवाच्या छायेत

पुणे (प्रतिनिधी) : मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग बारणे एकमेंकासमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये पार्थ पवार पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना ८६ हजार १०८ मतांनी आघाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना २९०५८४ तर पार्थ पवार यांना २०४४७६ मते मिळाली आहेत. बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत मावळ मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व आहे. यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदार संघात काय निकाल लागतो. याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी दिली होती.

मावळात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राष्ट्रवादीने िरगणात उतरवून चुरस निर्माण केली. पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठापणाला लागल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मावळच्या लढतीकडे लागले होते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा लोकसभेच्या िरगणात होते. तर, पार्थ आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला सामोरे गेले. सुमारे २३ लाख मतदारसंख्या असलेल्या मावळसाठी ५९.४९ टक्के मतदान झाले. बारणे आणि पवार यांच्या मुख्य लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील किती मते घेतात, यावर मावळच्या विजयाचे बरेचसे गणित अवलंबून असणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार असून हे मतदार मावळचा खासदार कोण, हे ठरवणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ रायगड, तर उर्वरित तीन पुणे जिल्ह्य़ातील आहेत.

351 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे