Breaking News

 

 

नागावमधील लाखोंच्या घरफोडीतील दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद…

टोप (प्रतिनिधी) : नागाव (ता. हातकणंगले) येथील संभाजीनगर येथे राहणारे माजी सरपंच भीमराव खाडे यांच्या घरी मागील वर्षी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी यावेळी सुमारे २४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख साडेचार लाख रुपये असा तब्बल १३ लाखांचा मु्द्देमाल लंपास केला होता. यामधील दोन आरोपींना पकडण्यात शिरोली पोलिसांना आज (बुधवार) यश आले. अमीर गणी सनदी आणि अदिनाथ संजय नरसिंगे अशी या चोरट्यांची नावे आहेत.

पोलीसांनी चोरट्यांकडून २४ तोळे सोने, एक बजाज पल्सर मोटरसायकल, अॅक्सेस मोपेड, एलइडी टीव्ही, होम थिएटर, एचपी कंपनीचा लॅपटॉप असा सुमारे ९ लाखांचा मुदेमाल हस्तगत केला. तसेच या चोरट्यांनी शिरोली, गांधीनगर परिसरात चोरी केल्याचेही सांगितले. तर चोरीच्या पैशातून मोपेड खरेदी केल्याचे सांगितले. अमीर गणी सनदी (वय २८, रा. दत्त कॉलनी, माळवाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि आदिनाथ संजय नरसिंगे (वय १९, रा. माळवाडी, शिरोली) अशी आहेत.

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात नागाव येथे राहणारे भिमराव खाडे हे आपल्या कुटुंबाला घेवून गारगोटी (ता. भुदरगड) येथे गेले होते. यावेळी घरी कोणी नसल्याचा अंदाज घेवून या चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडीकोयंडा उचकटून चोरी केली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसानी शर्थीचे प्रयत्न केले, पण सुगावा लागला नव्हता. अखेर सात महिन्यानंतर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या हलचालीवर बारकाईने लक्ष ठेवले आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानी शिरोली परिसरात एक आणि गांधीनगर परिसरात घरफोडी केल्याचे सांगितले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

901 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *