Breaking News

 

 

हरळी खुर्दजवळ कार झाडावर आदळली : तीन जखमी

महागाव (प्रतिनिधी) : गडहिंग्लज – चंदगड राज्यमार्गावर हरळी खुर्द येथे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा ताबा सुटून कार कडेच्या झाडावर आदळली. या अपघातात तिघे जखमी झाले. त्यापैकी शामराव देसाई (वय ५०) हे गंभीर तर वसंत देसाई (६०) नंदा देसाई (५५, सर्व रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देसाई कुटुंब हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील बहिणीला भेटण्यासाठी वॅगन आर (एमएच ०६ ए झेड ०६१६) मधून गेले होते. परतत असताना हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथे समोरुन येणाऱ्या  दुचाकीस्वाराला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेच्या झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये तिघेही जखमी झाले.

4,127 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे