Breaking News

 

 

शिरोली कबड्डी स्पर्धा : जय हनुमान, शिवमुद्रा अजिंक्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिरोली पुलाची  येथील सर्वेश्वर क्रीडा मंडळातर्फे आयोजीत कबड्डी स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात बाचणीच्या जय हनुमान क्रीडा मंडळाने, तर ५५ किलो वजनी गटात कौलवच्या शिवमुद्रा क्रिडा मंडळाने विजेतेपद पटकावले. शिरोलीच्या नवभारत क्रीडा मंडळ व वाठारच्या बाल शिवाजी क्रिडा मंडळास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  या स्पर्धेचे उद्घाटन आ. डॉ. सुजीत मिणचेकर, सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते झाले.

६५ किलो वजनीगटातील पहिल्या उपांत्य सामन्यात जय हनुमान संघाने (बाचणी) व यजमान सर्वेश्वर क्रीडा मंडळाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात नवभारत क्रीडा मंडळाने (शिरोली) व राष्ट्रसेवा क्रीडा मंडळ (तळसंदे) संघाचा पराभव करून अंतिम फेरीत जागा मिळवली.

अंतिम सामना जय हनुमान (बाचणी) आणि नवभारत क्रीडा मंडळ (शिरोली) यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये मध्यंतरापर्यंत जय हनुमान संघाकडे ( ७-६) अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. मध्यंतरानंतर जय हनुमानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नवभारत संघावर (१७-९) असा आठ गुणांनी मात करीत विजेतेपद मिळवले. तृतीय क्रमांकाचा मानकरी सर्वेश्वर क्रीडा मंडळ (शिरोली) ठरला.

तसेच ५५ किलो वजनीगटात पहिल्या उपांत्य सामन्यात शिवमुद्रा संघाने (कौलव) ने नवभारत  क्रीडा मंडळ (शिरोली) चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बाल शिवाजी क्रीडा मंडळ (वाठार) ने स्वराज्य क्रीडा मंडळ (इचलकरंजी) संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात शिवमुद्रा संघाने वाठार संघाचा (२६-१२) असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांकाचा मानकरी नवभारत क्रीडा मंडळ (शिरोली) ठरला.

या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई : नदीफ हादगिरी व प्रसाद पाटील (नवभारत), उत्कृष्ट पकड : रणजित वाघ (सर्वेश्वर), अक्षय कुंभार (बाल शिवाजी, वाठार). अष्टपैलू खेळाडू : अक्षय जाधव (जय हनुमान, बाचणी), प्रदीप हुजरे (कौलव) आणि ‘मॅन ऑफ द डे’ चा पुरस्कार अजिंक्य केळुसकर (सर्वेश्वर) च्या खेळाडूने पटकावला.

यावेळी धैर्यशील माने आणि अभयकुमार वंटे यांनी या स्पर्धेला भेट दिली. सामन्याचा बक्षिस वितरण माजी आ. राजीव आवळे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जि.प.सदस्य महेश चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, ग्रा.पं.सदस्य संग्राम कदम, विनायक कुंभार, निखिल पाटील, संदीप कांबळे, किरण कौंदाडे, विजय पोवार यांच्या हस्ते करण्यात आला.

312 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा