Breaking News

 

 

आबिटकर हेल्थ फौंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबीर : आ. प्रकाश आबिटकर

आजरा (प्रतिनिधी) : महिलांच्या आरोग्यासाठी तसेच लहान मुले, नागरीकांच्याही आरोग्यासाठी कै.सुशिलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फौंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर २५ मे ते १ जुलैपर्यंत आयोजीत केले आहे. यामध्ये जनरल फिजीशीयन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, शल्यचिकीत्सक या तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्याची तपासणी करणार असल्याची माहिती आ.प्रकाश आबिटकर यांनी आज (बुधवार) दिली.

यावेळी आ.आबिटकर म्हणाले, मोठ्या शहरांतील आर्थिक संपन्न कुटुंबामध्ये आजाराविषयी खूप जागरुकता आहे. एखाद्या व्यक्तीला आजार नसले तरी नियमीत आरोग्याची तपासणी केली जाते. मात्र ग्रामीण भागातील लोक आजारी पडले, तरी दवाखान्यात जात नाहीत. आणि वेळोवेळी तपासणीही करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण आपल्याकडे वाढलेले दिसते. यासाठी राधानगरी,भुदरगड, आजरा तालुक्यातील गरजू व गरीब नागरीकांसाठी दि. २५ मे ते दि. १ जुलैपर्यंत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

यामध्ये संपूर्ण रक्त तपासणी, ईसीजी, मधुमेह सारख्या अनेक तपासण्या घेण्यात येणार आहेत. तरी या मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन आ. आबिटकर यांनी केले.

हे शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र (धामोड), प्राथमिक शाळा (कौलव), ग्रामीण रुग्णालय (सोळांकूर), ग्रामीण रुग्णालय (राधानगरी), ग्रामीण रुग्णालय (आजरा), प्राथमिक शाळा (गवसे, ता.आजरा), प्राथमिक शाळा (शिरगांव), आरोग्य उपकेंद्र (तुरंबे), आरोग्य उपकेंद्र (तांबाळे), प्राथमिक आरोग्य केंद्र (मडिलगे बुद्रुक), प्राथमिक शाळा (पुष्पनगर), प्राथमिक शाळा (दारवाड), प्राथमिक आरोग्य केंद्र (राशिवडे), प्राथमिक आरोग्य केंद्र (कसबा तारळे), आरोग्य उपकेंद्र (कूर), प्राथमिक आरोग्य केंद्र (मिणचे खुर्द), प्राथमिक आरोग्य केंद्र (पिंपळगाव), प्राथमिक शाळा (शेळोली), प्राथमिक आरोग्य केंद्र (कडगांव), प्राथमिक आरोग्य केंद्र (कसबा वाळवे) येथे होणार आहे.

2,346 total views, 9 views today

2 thoughts on “आबिटकर हेल्थ फौंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबीर : आ. प्रकाश आबिटकर”

  1. गोरगरीब व सामान्य लोकांच्या साठी खूप चांगला उपक्रम
    राबवल्या बद्दल मी बाजीराव तोरसकर …. चक्रेश्र्वर वाडी
    आपले आभार मानतो.

  2. गोरगरिबांसाठी खुप चांगला उपक्रम हाती घेण्यात आल्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप खूप आभार व अभिनंदन करतो
    ….. प्रकाश पांडुरंग पाटील कोनवडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग