Breaking News

 

 

विवाहितेचा हुंड्यासाठी छळ : पतीसह चौघांवर गुन्हा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : माहेरहून पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोने आणण्यासाठी पती, सासू, सासरे, आतेसासूने मानसिक, शारीरिक छळ केल्याची फिर्याद गडहिंग्लज पैकी हट्टी बसवाना येथील विवाहितेने गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दिली. रूपाली आकाश हत्ती (वय २४)  असे तिचे नाब आहे. तिच्या फिर्यादीनुसार, पती आकाश, सासरे सुभाष हत्ती, सासू सुमित्रा हत्ती आणि आतेसासू सुनीता हत्ती यांचेवर गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, रूपाली व आकाश यांचा प्रेमविवाह झाला होता. पण घरच्यांना तो मान्य नव्हता. त्यामुळे सासू-सासरे, आत्या वारंवार तू आमच्या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीस. माहेरुन काही न आणता मोकळी आलीस असे टोमणे मारून वारंवार तिला उपाशी ठेवण्यात आले. तर ९ मार्च रोजी रात्री एकच्या सुमारास तिला शिवीगाळ व मारहाण करून पाच लाख व पाच तोळे सोने घेऊन आलीस तरच घरी यायचे, असा दम दिला. तर पती आकाश याने ३० एप्रिल रोजी नांदायला आली नाहीस तर सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानुसार पतीसह, सासू-सासरे, आत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गडहिंग्लज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

4,284 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे