Breaking News

 

 

पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी होण्याच्या नेत्याच्या दाव्याची सोशल मिडियावर खिल्ली !

नागपूर (प्रतिनिधी) : गुरुवारी मतमोजणी सुरु होईल तेव्हा पहिल्या फेरीपासून आघाडीवर असेन आणि किमान पाच लाखांच्या मताधिक्याने मी विजयी होईन, असा अति आत्मविश्वास काँग्रेस नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले हे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढले आहेत. मात्र त्यांचा अति आत्मविश्वास पाहून सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

नागपुरातील मतदान पार पडल्यावर देशातील १५ राज्यात प्रचारासाठी  फिरण्याची संधी मिळाली. त्यामध्ये देशात मोदी सरकारविरोधात संतापाची लाट असल्याचे दिसून आले आहे. यंदा विदर्भासह राज्यात वंचित आणि तिसऱ्या आघाडीचा प्रभाव नव्हता. नागपुरात ५ लाखांच्या मताधिक्याने निवडून येईन तर सेक्युलर मतांमुळे आम्ही विदर्भातील दहाही जागा जिंकणार असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

त्यांची या दाव्याची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. नाना तुम्ही ५ लाखांच्या मताधिक्याने विजयी झाला तर मग इव्हीएम घोटाळा झाला असा आरोप तुम्ही करू शकणार नाही, तर तुमच्या काँग्रेस पक्षावर हे आरोप होतील, असे एकाने म्हटले आहे. तर नाना तुम्ही एवढ्या मतांनी विजयी झालात तर त्याची गिनीज बुकात नोंद होईल, असे एकाने म्हटले आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने तुम्हाला इतकी मते पडणार म्हणजे मी गडकरींना दिलेले मत तुम्हाला गेले की काय, अशी उपरोधिक शंका व्यक्त केली आहे.

1,050 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे