Breaking News

 

 

..मग तर राज्यात सर्व जागा जिंकू : प्रकाश आंबेडकर

मुंबई (प्रतिनिधी) : विविध एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र यावरुन विरोधकांनी ईव्हीएममध्ये गडबडी केल्याचा आरोप केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. जर ईव्हीएम हॅक झालं नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  देशभरात पुन्हा एनडीएला बहुमत मिळेल अशी शक्यता फार कमी आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचं नाही पण ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ईव्हीएममध्ये गडबड झाली नसेल तर भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सोलापूर, अकोला, सांगली, वर्धा, नागपूर, नाशिक अशा विविध मतदारसंघात चांगली लढत झाली आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला निश्चित यश मिळेल. मुस्लिम मतदारांनी युती-आघाडी दोघांनाही नाकारलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात अनेक जागा मिळतील असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

615 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा