Breaking News

 

 

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरमधील कुलगाम येथे आज (बुधवार) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

कुलगाममधील गोपालपुरा येथे सुरक्षा दलांच्या शोधमोहीमे दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळी अद्याप शोधमोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीही अवंतीपोरा येथील पंझगाम येथे चकमक झाली होती. या चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तिन्ही दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे होते.

183 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा