Breaking News

 

 

अपात्र कर्जमाफीतील शेतकरी उद्या आ. मुश्रीफांना भेटणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेले शेतकरी उद्या (बुधवार) आ. हसन मुश्रीफ यांना भेटणार आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीतील केंद्र कार्यालयात दुपारी चार वाजता आ. मुश्रीफ यांच्यासह बँकेच्या संचालकांना हे शेतकरी भेटणार आहेत. याबाबतचे एक निवेदन कोल्हापूर जिल्हा अपात्र कर्जमाफी समितीच्यावतीने बँकेला दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेत अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढाईत आ. मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठे योगदान दिले आहे. राजकीय आकसातून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपामुळे बँकेने या न्यायालयीन लढाईतून अंग काढून घेऊ नये. या पुढेही बँकेने कर्जमाफी योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे,  असे आवाहनही या निवेदनात केले आहे.

138 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा