Breaking News

 

 

उपमुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचे ‘हे’ स्पष्टीकरण !

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना केवळ ३ महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रिपद घेणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची भाजपकडून ऑफर दिल्याची चर्चा होती. पण त्या ऑफरला शिवसेनेकडून नकार देण्यात आली असल्याची माहिती आहे. ‘एनडीए’च्या बैठकीला उपस्थित राहण्याअगोदर ही ऑफर दिल्याचीही चर्चा होती.

उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून शिवसेनेला ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्यावर आपल्याला कोणतीही ऑफर देण्यात आली नाही आणि फक्त ३ महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही अशी स्पष्ट भूमिकाही शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.

पुढच्या अडीच ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे फक्त तेवढ्याच कालावधीसाठी उपमुख्यमंत्रिपद शिवसेना स्वीकारणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपने उपमुख्यमंत्री पदाची कोणतीही ऑफर दिली नाही अशी स्पष्ट माहितीही यावेळी देण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या वेळीदेखील शिवसेनेतील नेत्यांना मोठी पदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या बड्या नेत्यांना नवी पदं देण्यात येणार आहेत. पण असं असलं तरी उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेना उत्सुक नसल्याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

321 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे