Breaking News

 

 

प्रा. रमेश दळवी यांच्या स्मृतिदिनी आयोजित उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद…

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी येथे प्रा.रमेश दळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. कै.प्रा.रमेश दळवी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, बसरेवाडी सामाजिक संस्था आणि दळवी कुटुंबामार्फत मोफत आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर व अवयवदान दान उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे उद्धघाटन जि.प.सदस्य जीवन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य शिबिरांमध्ये सुमारे शंभर ते दिडशे रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये जनरल तपासणी, मोफत धनुर्वाद इंजेक्शन, तसेच हार्निया,प्रोटेड, मुतखडा,दमा,खोकला आणि इतर आरोग्य समस्यांची तपासणी करुन  औषधोपचार करण्यात आले.

तसेच रक्तदान शिबिरास सुमारे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधिलकी जपली. तर अवयवदान हा एक आदर्श उपक्रम म्हणून इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवम साधक, सागर गुरव यांनी यामध्ये सत्तावीस युवकांचा अवयवदान संकल्प करून घेतला.

यावेळी सदस्य अजित सुतार, अमर पाटील, माजी सरपंच रवी देवेकर, गणपती ढेरे, संस्थापक अध्यक्ष संदीप दळवी, सुनिल मोरे, शिवाजी पाटील, सुनिल मोरे, सुरेश पाटील, सागर गुरव,ग्रामस्थ उपस्थित होते.

564 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे