Breaking News

 

 

भाजप सत्तेतही येईल, मात्र त्यानंतर देशातील लोकशाही संपुष्टात…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणूक पार पडली आहे. निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात एनडीएला बहुमत मिळेल आणि भाजप सत्तेतही येईल, मात्र त्यानंतर देशात लोकशाहीचा अस्त होईल. हुकुमशाही पर्वाला सुरुवात होईल, असे खळबळजनक विधान स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाजपाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ‘कॅप्चर’ केली आहे असाही आरोप केला.

निवडणूक निकालानंतर देशात लोकशाही नाही तर हुकुमशाही नांदेल. घटनात्मक व्यवस्था कोसळून जाईल. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणं गरजेचं आहे. काँग्रेस हा भाजपाला सक्षम पर्याय नाही. भविष्यात ज्या समस्या या देशात उभ्या रहाणार आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही काँग्रेस सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरली आहे. शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी काँग्रेसने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत असाही आरोप यादव यांनी केला आहे.

देशात आधी बूथ कॅप्चर केले जायचे. मात्र भाजपाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली आहे. यासाठी काठ्या आणि बंदुकांचा नाही तर कॅमेरा आणि टीव्ही माध्यमांचा वापर करत भाजपाने निवडणूक कॅप्चर केली. सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही इतका अमाप पैसा भाजपाने निवडणुकीत खर्च केला आहे, अशा शब्दात यादव यांनी भाजपवर शरसंधान केले.

387 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश