Breaking News

 

 

अन्यथा जूननंतर कुरणेवाडीतील शाळा बंद : डे. सरपंचांंचा इशारा

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कुरणेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या अंगणात असलेल्या विद्युत डीपीकडे विद्युत महामंडळाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या विद्युत डीपीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत जर हा डीपी येथून हलवावा अन्यथा जूननंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालकांच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती धामोडच्या डे. सरपंच सौ. सारिका कुरणे यांनी आज (मंगळवार) सांगितले.

यावेळी कुरणे म्हणाल्या, दोन वर्षांपासून हा विद्युत डीपीचा विषय प्रलंबित आहे. ग्रामपंचायत आणि शाळेने वारंवार विद्युत मंडळाला लेखी नोटीस देऊन देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आ. प्रकाश आबिटकर यांनीही संबंधित विभागाच्या राधानगरीतील कार्यालयाला सुनावले होते. परंतु तरीही तेथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मे अखेर हा डीपी येथून हलवला नाही, तर जूननंतर सुद्धा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यावेळी मुख्याध्यापक नानासाहेब माने, शामराव शेटके, शिवाजी कुरणे, प्रकाश कोरे,भगवान खोत, सागर कुरणे, दगडू चौगले, सविता तेली, सुभाष खोत, तानाजी खोत, विनायक कोरे, राजाराम जोंधळकर यांच्यासह पालक उपस्थित होते.

1,989 total views, 3 views today

One thought on “अन्यथा जूननंतर कुरणेवाडीतील शाळा बंद : डे. सरपंचांंचा इशारा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे