Breaking News

 

 

उद्यमनगर येथे ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भरघाव ट्रकने ठोकरल्याने अमर आप्पासाहेब साळवी (वय ४५, रा. शाहुपूरी) याचा आज (मंगळवार) जागीच मृत्यू झाला. उद्यमनगर येथील भारत बेकरीजवळ सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला.

साळवी हा रिक्षातून उतरत असतानाच वाय.पी.पोवार नगरमधून बीग बाजारकडे भरघाव जाणाऱ्या ट्रक (क्र. एमएच ११ एम ५०५६) ने साळवी यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

246 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे