Breaking News

 

 

अरुणाचल प्रदेशमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आमदारासह ११ जणांचा मृत्यू !

ईटानगर (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तिरोंग अबो यांचेसह घरातील ११ जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अबो यांच्या कुटूंबीयांसह सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे.

नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँँड (एनएससीएन) च्या दहशतवाद्यांनी आज (मंगळवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घरावर हल्ला केला. ही घटना अरूणाचल प्रदेशातील तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी म्हटले आहे की, आमदार अबो व त्यांच्या कुटूंबीयांच्या मृत्यूच्या बातमीने एनपीपी दु:खी आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. तसेच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे दोषींविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी करत असल्याचे सांगितले.

168 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा