Breaking News

 

 

कोल्हापुरात वीरशैव कक्कया समाजाच्या संघटनेत फूट !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील वीरशैव कक्कया समाजाच्या संघटनेत फूट पडली असून जुने व नवे संचालक मंडळ असे दोन गट पडले आहेत. संघटनेचे यावर्षीचे अधिवेशन कधी घ्यायचे यावरून वाद सुरू झाला आहे. समाजाच्या शिल्लक जमिनीवर डल्ला मारण्याच्या दृष्टीने मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप संघटनेचे संचालक निरंजन कदम यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला.

संचालक मंडळाचा कार्यकाल २०१२ ते २०१७ असा असताना आजपर्यंत सर्वसाधारण सभा झाली नाही. निवडणूक न घेता काही जुन्या संचालकांना नोटीस न देता होयबा संचालक नियुक्त केले आहेत. विनापरवाना पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप करून यासंबंधी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्याचे कदम यांनी सांगितले.

संघटनेचे या वर्षीचे अधिवेशन दुष्काळ, उन्हाळा यामुळे मे महिन्यात न घेता ते नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घ्यावे, अशी सूचना केली असूनही संघटनेच्या शिवाजी पोळ, हरिदास सोनवणे, राजू पोळ यांनी अधिवेशन २५ मे रोजी घेण्याचा घाट घातला आहे. संघटनेत फूट पडावी या हेतूनेच हा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेचा बेपर्वा कारभार न थांबल्यास वेळ पडल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी दिलीप कोकणे, किशोर कदम, मधुकर पोळ, विजय सोनवणे, धोडीराम वटकर, रमेश कदम, रविंद्र कोळ उपस्थित होते.

285 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश