Breaking News

 

 

गोव्यात २७ पासून अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू संघटनांच्या एकजुटीसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने दि २७ मे ते ८ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा (गोवा) येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किरण दुसे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

किरण दुसे यांनी सांगितले की, अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे देशभरात
हिंदू राष्ट्र संकल्पनेची जागृती झाली आहे. या अधिवेशनात २६ राज्ये तसेच बांगलादेश येथील २०० हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार
आहेत.

केंद्रात सरकारच्या स्थापनेनंतर काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन, समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, धर्मातर बंदी, अयोध्येत श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी हिंदूंवर प्रलंबित असलेल्या समस्यांवर विचारमंथन करून सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडण्याच्या दृष्टीने संघटनात्मक प्रयत्नांची निश्चिती या अधिवेशनाच्याद्वारे केली जाणार आहे. तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदू रक्षण करण्याच्या संदर्भातही चर्चा केली जाणार आहे.

सौ. राजश्री तिवारी म्हणाल्या की, दि २९ मे ते ४ जून या कालावधीत सोशल
मिडीया कॉन्क्लेटचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हिंदु राष्ट्र संघटक
प्रशिक्षण अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला कोल्हापूर येथून हिंदूत्वनिष्ठ उद्योजक, हिंदूत्वनिष्ठ अधिवक्ता, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थान यासह २० हिंदूत्वनिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सुरेश यादव उपस्थित होते.

387 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश