Breaking News

 

 

ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगाचे ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याचे सर्व आरोप फेटाळले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरुन निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचे व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

‘मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स उमेदवारांसमोर योग्य पद्धतीने सील करण्यात आल्या होत्या. यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेरेही होते. सीपीएफ सुरक्षा जवानदेखील उपस्थित होते. सर्व आरोप निराधार आहेत’, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

684 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *