Breaking News

 

 

कर्नाटक सरकारवर अस्थिरतेचे सावट : कुमारस्वामींंकडून दिल्ली दौराच रद्द !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या निकाला अगोदरच कर्नाटकात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचे सरकार संकटात येण्याची चिन्हे दिसत आहेत. या बदलत्या राजकीय घडामोडी पाहता कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींनी त्यांचा आजचा दिल्ली दौराच रद्द केला आहे.

मतदाना दरम्यान ईव्हीएममध्ये गडबड झाल्याच्या मुद्यावर दिल्लीमध्ये आज (मंगळवार) विरोधी पक्षांचे नेते निवडणूक आयोगाबरोबर बैठक करणार होते. मात्र, कर्नाटकातील बिघडलेली राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी बंगळुरात राहणेच पसंत केल्याचे दिसत आहे. तर कर्नाटकात काही सत्ताधारी नेत्यांकडूनच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी आज सायंकाळी काँग्रेस महासचिव व कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी के.सी वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत.

एका एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपाला २८ जागांपैकी २१ ते २५ जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या पदरात केवळ ३ ते ६ जागा येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात भाजपाला ४९ टक्के मते मिळतील. तर काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना ४३ टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

705 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash