Breaking News

 

 

अखेर विवेक ओबेरॉयने मागितली माफी

मुंबई (प्रतिनिधी) : एक्झिट पोल, ओपिनियन पोल आणि निकाल यातील फरक स्पष्ट करण्यासाठी विवेक ओबेरॉय याने एक मीम सोशल मिडीयावर शेअर केले आणि त्याच्यावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. कला विश्वातील सेलिब्रिटी मंडळींपासून महिला आयोगापर्यंत सर्वांनीच त्याच्या या कृतीवर नाराजीचा सूर आळवला. आपण, फक्त एक सोशल मिडीया पोस्ट शेअर केली असून त्या प्रकरणी माफी मागण्यास विवेकने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. पण, होणारा विरोध पाहता त्याला शरणागती पत्करावी लागली आहे.

‘अनेकदा कोणा एकाला विनोदी आणि कोणासाठीही त्रासदायक ठरणार नाहीत असं वाटणाऱ्या गोष्टी इतरांनाही त्याच दृष्टीकोनातून दिसतीलच असं नाही. मी गेल्या दहा वर्षांपासून २ हजारहून जास्त महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे. कोणा एका महिलेचा अनादर करण्याचा विचारही मी करु शकत नाही’, असं ट्विट त्याने केले आहे. यासोबतच आणखी एक ट्विट करत त्याने माफी मागत ते वादग्रस्त ट्विट डिलीट केल्याचे स्पष्ट केले आहे. 

1,119 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग