Breaking News

 

 

एक्झिट पोलमुळे ‘या’ पक्षाने ‘एनडीए’ला साथ देण्याचे दिले संकेत…

भुवनेश्वर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल पाहून प्रादेशिक पक्षांनी २३ मे नंतरची आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. ओडिशाचा प्रमुख पक्ष असलेल्या बीजू जनता दलाने संकेत दिलेत की २३ मेचा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच असला तर बीजेडी एनडीएत सामील होऊ शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावरील टीका कमी केली होती. फनी चक्रीवादळाच्या वेळी मोदींनी पटनायक यांचे कौतुकही केले होते. बीजेडीचे प्रवक्ता अमर पटनायक म्हणाले, आमच्या मागण्या पूर्ण करेल त्या आघाडीला आम्ही समर्थन देऊ. जर एनडीए सरकार बनवत असेल, तर आम्ही एनडीएला समर्थन देऊ शकतो. असे पटनायक म्हणाले.

1,098 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे