Breaking News

 

 

विवेक ओबेरॉयवर गुन्हा दाखल करा : नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी) : एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर त्यासंदर्भातले एक मीम अभिनेता विवेक ओबेरॉयने पोस्ट केले. या मीमध्ये ऐश्वर्या रायची खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने विवेक ओबेरॉय विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

एवढंच नाही तर केंद्र आणि राज्य सरकार कारवाई का करत नाही. सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर जनतेमधून उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष घालावे अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.


या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे. त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे.

705 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे