Breaking News

 

 

दुष्काळी उपाययोजनांबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने खडसावले…

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने आज (सोमवार) पुन्हा एकदा खडसावले. आज झालेल्या सुनावणीदरम्यान दुष्काळ आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. या सगळ्याचा सविस्तर तपशील देण्यासाठी न्यायालयाने सरकारला येत्या शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुष्काळात काय उपाययोजना केल्या त्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन मुख्य सरकारी वकीलांनी हजर रहावे, असे आदेशही मागील आठवड्यात राज्य सरकारला दिले होते. मात्र, तरीही आजच्या सुनावणीला मुख्य सरकारी वकील गैरहजर राहिले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यात दुष्काळाचे व्यवस्थापन सुरू नसल्याबद्दल मराठवाडा विकास मंचाचे संजय लाखे-पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत राज्यात अनेक धरणातील पाणीसाठा शून्य टक्के आहे. दुष्काळाची स्थिती गंभीर असताना सरकारकडून पाणीपुरवठ्याच्या सुविधा आणि इतर उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

360 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash