Breaking News

 

 

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे २२ गुन्हे दाखल…

कोतोली (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील भरारी पथकाने आजअखेर (सोमवार) आचारसंहिता भंग करणाऱ्या २२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन व नियंत्रणासाठी जिल्हा निवडणूक विभागाने कोल्हापुरात आणि हातकणंगलेमध्ये ३० भरारी पथकांची स्थापना केली आहे.

मतदार नोंदणी मतदान व मतमोजणी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत निर्भय वातावरणात पार पडावी,यासाठी सुमारे २१ हजार शासकीय कर्मचारी परिश्रम घेत आहेत. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून या नियोजनासाठी निवडणूक विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय बैठका सुरू आहेत.

भरारी पथकामध्ये एक नोडल अधिकारी, एक सहकारी, एक पोलीस कर्मचारी, व्हिडिओग्राफर आदींचा समावेश आहे. तसेच सहा विधानसभा मतदारसंघात २८ भरारी पथकातील  ४० स्थिर सर्वेक्षण पथके, २४ निरिक्षक, व्हिडिओ निरिक्षक, १३ व्हिडिओ पाहणी, ७ लेखा पाहणी पथके कार्यरत आहेत.

लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात ३० भरारी पथक. ३१ सर्वेक्षण पथके, ७ खर्च निरीक्षक पथके, २१ व्हिडिओ निरीक्षक, १२ व्हिडिओ पाहणी, ७ लेख आणि पथके कार्यरत आहेत.

355 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा