Breaking News

 

 

एक्झिट पोलवरून विवेक ओबेरॉयकडून ऐश्वर्या रायची खिल्ली !

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी मोठ्या खुलेपणाने माध्यमांपासून चाहत्यांपर्यंत प्रत्येकापुढे ठेवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमुळे चर्चेत असणारा अभिनेता विवेक ओबेरॉय हा त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. त्याने मिममध्ये चक्क आपली माजी प्रेयसी ऐश्वर्या रायची खिल्ली उडवली आहे.

सध्याच्या घडीला संपूर्ण देशात एक्झिट पोलच्याच चर्चा सुरू आहेत. देशात कोणाची सत्ता स्थापन होणार, याविषयीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच विवेकने ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि निवडणुकांच्या निकालांमध्ये असणारा फरक स्पष्ट केला आहे. पण, त्याला थोडं वेगळं वळण देत. ‘ओपिनियन पोल’, ‘एक्झिट पोल’ आणि निकाल यामध्ये बरीच तफावत असते, अशा आशयाचं एक विनोदी मीम त्याने ट्विटरवर शेअर केलं आहे. ज्यावर चक्क अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अभिषेक बच्चन झळकत आहेत. 

सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो असणाऱ्या भागावर ओपिनियन पोल असं लिहिण्यात आलं आहे. खुद्द विवेक आणि ऐश्वर्याचा फोटो आहे, त्यावर एक्झिट पोल असं लिहिण्यात आलं आहे. तर, अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या फोटोवर ‘रिझल्ट्स’ अर्थात निकाल असं लिहिण्यात आलं आहे. हे मीम शेअर करताना त्याने कॅप्शन देत लिहिलं, ‘ही कलात्मकता आहे, यात राजकारण नाही… हेच आयुष्य….’ विवेकने शेअर केलेलं हे मीम पाहता आता ते उर्वरित सेलिब्रिटी मंडळी तितक्याच विनोदी अंगाने घेणार की त्यावर गांभीर्याने चर्चा करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे याला राजकीय वळणही देण्यात येत आहे.

1,883 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग