Breaking News

 

 

एक्झिट पोलवर माझा विश्वासच नाही : आ. मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात सर्वच जनमत चाचण्यांचा कल हा एनडीएकडे वळल्याने पुन्हा देशात मोदी सरकार येणार असल्याची चर्चा होत आहे.मात्र एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी आज (सोमवार) ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व सातही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी व निकालाची तारीख जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर काल (रविवार) संध्याकाळी देशात अनेक वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी केलेली जनमत चाचणी जाहीर केली. यामध्ये देशात पुन्हा एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळेल, केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असे या सर्व जनमत चाचण्यांचे निष्कर्ष बाहेर पडले आहेत.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी सर्व जनमत चाचण्यांचे निष्कर्ष फेटाळून लावताना एक्झिट पोलवर माझा विश्वासच नाही, असे म्हटले आहे. सर्व एक्झिट पोल एकसारखे नाहीत. त्यामुळे ते विश्वासार्ह नाहीत. यापूर्वी भाजपने ‘इंडिया शायनिंग’चा नारा करीत भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा केला होता, पण तो खोटा ठरल्याचे आठवण मुश्रीफ यांनी करुन दिली. एक्झिट पोलवरुन निकालापूर्वी प्रतिक्रिया देण्यापेक्षा निकालानंतर मी माझे मत व्यक्त करीन. कारण कोल्हापूरात काय होणार आहे, तेही मला माहिती आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

3,845 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश