Breaking News

 

 

निकालाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणार मोदींचा बायोपिक !

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शन लांबणीवर पडलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ मे रोजी भारतासह तब्बल ४० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोदी यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता विवेक ऑबेरॉयने ही माहिती ट्विटवरून दिली आहे.

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पी.एम. नरेंद्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पी.एम.नरेंद्र मोदी या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हे पोस्टर लॉन्च झाले आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रथम  ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि संदीप सिंग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

390 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा