Breaking News

 

 

पहिला सर्जिकल स्ट्राईक २०१६ मध्येच ! : ले.ज.रणबीर सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने पहिला सर्जिकल स्ट्राईक सप्टेंबर २०१६ मध्येच केला होता. तसेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. ही हवाई दलाची उल्लेखनीय कामगिरी असल्याची माहिती भारतीय सैन्य दलाचे उत्तर विभागाचे कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अनेकदा सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उचलण्यात आला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच जम्मू येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने पहिला सर्जिकल स्ट्राईक कधी झाला याची माहिती, माहिती अधिकाराखाली मागवली होती. त्यावेळी डीजीएमओने पहिला सर्जिकल स्ट्राईक सप्टेंबर २०१६ मध्ये झाल्याची माहिती दिली होती. तसेच २०१६ पूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, राजकीय पक्ष सर्जिकल स्ट्राईकवर काय वक्तव्य करतात, याबाबत आपण काहीही बोलणार नाही. त्यांना सरकारच उत्तर देईल, असे रणबीर सिंह म्हणाले. तसेच आपण जे सांगतोय तेच सत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

384 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे