Breaking News

 

 

एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर विरोधकांमध्ये चलबिचल : बैठक पुढे ढकलली !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार केंद्रात पुन्हा एकदा बहुमताने मोदी सरकार येण्याची शक्यता आहे. हे अंदाज जाहीर झाल्यानंतर आता विरोधकांच्या रणनीतीमध्येही बदल झाला आहे. त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेची गणिते जुळवण्यासाठी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटीही सुरु झाल्या होत्या. मात्र, एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर विरोधकांचे मनसुबे पार धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.

मात्र, ही अंदाजित आकडेवारी असल्याने विरोधकांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. मात्र, आता नाईलाजाने का होईना विरोधकांनी आपली रणनीती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच्या सत्तास्थापनेसाठी सोमवारी ‘बसपा’च्या सर्वेसर्वा मायावती दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार होत्या. मात्र, सोमवारी ‘बसपा’कडून ही भेट आता रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच २१ तारखेला सर्वपक्षीय विरोधकांची होणारी बैठकही २४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

1,092 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *