Breaking News

 

 

बँक ऑफ बडोदाकडून ९०० शाखांना टाळे ?

बडोदा (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील ८०० ते ९०० शाखा बंद करण्याचा विचार सुरू आहे. यापूर्वी देना आणि विजया बँकांचे बडोदा बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे.  देना आणि विजया बँकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने ८०० ते ९०० शाखांना टाळे लावण्याची तयारी सुरु आहे.

एप्रिल महिन्यापासूनच बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार काही शाखांचे अन्यत्र स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणानंतर तिन्ही बँकांच्या शाखा एकाच इमारतीमध्ये चालत असल्याची माहिती मिळाली आहे.

अतिरिक्त खर्च रोखण्यासाठी काही शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता एप्रिलपासून बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती बँक ऑफ बडोदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. येत्या काळात देशाच्या पूर्व भागात बँकेचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. बँक ऑफ बडोदाच्या देशभरात ९,५०० शाखा आहेत. या बँकेचे १३ हजार ४०० एटीएम आहेत, तर एकूण कर्मचारी संख्या ८५ हजार असून ग्राहकांची संख्या १२ कोटी आहे.

1,410 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा