Breaking News

 

 

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात : दोघांचा मृत्यू

रायगड (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूरजवळ दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास मिनी बस आणि व्होल्वो बसच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

खालापूर हद्दीत माडप ब्रिजजवळ पुण्याकडे जाणा-या मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातातील एक बस महाबळेश्वर येथे सहलीसाठी जात होती. वसईहून महाबळेश्वरला सहलीसाठी जाणारे २० जण या बसमध्ये होते. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. याबाबत जखमींची अधिक माहिती मिळाली नाही तरी, अद्याप अपघातस्थळी  वाहतूक पोलिसांसह स्थानिकांकडून मदत कार्य सुरू असल्याचे वृत्त मिळाले आहे.

699 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा