Breaking News

 

 

पुलाची शिरोलीत रंगला कबड्डीचा थरार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पुलाची शिरोली येथे सर्वेश्वर कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वजनी गटातील भव्य कब्बडी स्पर्धा आज (रविवार) सुरू झाल्या. या स्पर्धेत ६५ आणि ५५ किलो वजन गटातील तब्बल ७० संघ सहभागी झाले  आहेत. या स्पर्धा प्रकाशझोतात घेण्यात येत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आ. सुजित मिणचेकर यांचे हस्ते आणि सरपंच शशीकांत खवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सामन्याच्या पहिल्या दिवशी साधना (कोल्हापूर) विरूद्ध बाळासो क्रिडा मंडळ, एकता (तारळे) विरूद्ध महालक्ष्मी (पेठवडगांव), घोडेगीरी (शिरोली माळवाडी) विरुद्ध नव भारत (शिरोली),  बाल शिवाजी (शिरोळ) विरूद्ध शिवशंभो (तळसंदे) यांच्यात अटीतटीने सामने झाले.

यावेळी बाळासो कुंभार, संतोष स्वामी, शिवराज भोसले, उपसरपंच सुरेश यादव, माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, राजेश पाटील, संभाजी भोसले, सतिश पाटील, डॉ. सुभाष पाटील, ग्रा.पं. सदस्य मुनेर सनदे, संदिप कांबळे, विनायक कुंभार, मुकुंद नाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

429 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा