Breaking News

 

 

एक्झिट पोलमध्ये ‘फिर एक बार मोदी सरकार’…

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांनी आपले एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये भाजप आणि एनडीएसाठी अनुकूल कल पुढे आले आहेत. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार, असा अंदाज सर्वेक्षणांमधून पुढे आला आहे.

सर्व एक्झिट पोलची सरासरी पाहता एनडीएला २९६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मोदीलाट कायम असल्याचे चित्र जनमत चाचण्यांमध्ये दिसत आहे. मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी केलेली एकजूट तितकीशी प्रभावी ठरलेली नाही, असे साधारण चित्र आहे. 

एक्झिट पोलमध्ये एनडीएला ५४२ पैकी ३०६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बहुमताचा २७२ हा जादुई आकडा एनडीए सहज पार करेल, असे चिन्ह दिसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा प्रभाव पाडता आलेला नाही, असे दिसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सत्ता खेचून आणणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत तो करिष्मा दाखवता आलेला नाही, असे हे सर्वेक्षण सांगत असून यूपीएला १३२ जागांपर्यंतच मजल मारता येईल, असे दिसत आहे. तर एक्झिट पोलमध्य अन्य पक्षांना १०४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

2,040 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे