गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गायरानातील अतिक्रमणे हटवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेविरोधात विविध पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, आज चंदगड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गडहिंग्लज येथील प्रांताधिकारी कार्यालावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी ही अतिक्रमणे कायम करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना माघारी बोलवण्याची विनंती राष्ट्रपतींना निवेदनातून करण्यात आली. प्रांत कार्यालयासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली.