Breaking News

 

 

मुरगूडमध्ये विश्वकर्मा सुतार,लोहार समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात…

मुरगूड (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वकर्मा सुतार, लोहार समाजाचा पहिला वधू-वर सूचक मेळावा मुरगूड येथे उत्साहात झाला. जिल्ह्यातून सुमारे २७५  वधू-वरांनी या मेळाव्यात आपल्या नावांची नोंदणी केली. या मेळाव्याच्या निमित्ताने सुतार-लोहार समाजाची भक्कम एकजूट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते  झाले. उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके व पालिकेचे पक्षप्रतोद जयसिंगराव भोसले यांनी प्रतिमापूजन केले.

नगराध्यक्ष जमादारांनी सुतार, लोहार समाजाच्या संघटनेमुळे अनेक वधू-वरांची विवाह कार्य सहजपणे पार पडतील, असे सांगितले. या मेळाव्यात हातकणंगले, करवीर, पलूस, चंदगड ,कागल, भुदरगड, राधानगरी या तालुक्यातील वधू-वरांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याचे संयोजक प्रा. महादेव सुतारांनी सुतार-लोहार समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या विश्वकर्मा यांचे मंदिर बांधण्याचा संकल्प व्यक्त केला.

या मेळाव्यास विश्वकर्मा सुतार लोहार समाजाचे जिल्हाध्यक्ष विजयराव लोहार, सुतार-लोहार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष  अशोकराव सुतार,  शिवाजीराव सुतार, चिखली येथील संघटनेचे अध्यक्ष अजित लोहार,मुरगूड नगरपालिकेचे नगरसेवक, सुतार, लोहार समाजाचे कुटुंबिय सहभागी झाले होते.

405 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा