Breaking News

 

 

पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा दलाला तैनात करा : निर्मला सितारामण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज इथे सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे.  मात्र आजही येथे ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी तृणमुल काँग्रेसवर टीका केली आहे.  मतमोजणीपर्यंत तृणमुलच्या कार्यकर्त्यांकडून इथे नरसंहार घडवून आणला जाईल. त्यामुळे येथे २३ मे पर्यंत केंद्रीय सुरक्षा दलाला तैनात करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सितारामण म्हणाल्या की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुरुवातीपासून धमकी देत आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला भीती वाटते की, आज एकीकडे मतदान संपल्यानंतर तृणमुल काँग्रेसकडून दुसरीकडे नरसंहार सुरु होईल. त्यामुळेच ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी शेवटच्या ७ व्या टप्प्यातील मतदानादरम्यान मतदान केंद्रावर तृणमुलच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद झाल्यानंतर भाजपाचे अनुपम हाजरा यांनी तृणमुलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार निलांजन रॉय यांची गाडीही फोडण्यात असल्याचे सांगितले.

276 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा