Breaking News

 

 

टोपमध्ये दोन वृद्धांना मारहाण : एक गंभीर

टोप (प्रतिनिधी) :  टोप गावाच्या हद्दीत हिरवाई फार्म हाऊसवर काल (शनिवार) पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी महिला आणि वृद्धाला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तर त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी लंपास केली. मानसिंग जयसिंगराव जाधव (वय ८४) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची फिर्याद स्नेहलता दिनकरराव जवळेकर (वय ७७) यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.  

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, स्नेहलता दिनकरराव जवळेकर (रा. पुणे) या आपल्या भावाकडे म्हणजे मानसिंग जाधव यांच्याकडे राहण्यासाठी नेहमी येतात. जाधव व स्नेहलता जवळेकर हे दोघे शुक्रवारी रात्री जेवण करून हिरवाई फार्म हाऊसमध्ये झोपले असताना अज्ञात हल्लेखोरानी त्यांच्या फार्म हाऊस मध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला करून दोघांना मारहाण करून जखमी केले. स्नेहलता जवळेकर यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन हिसकावून चोरट्यांनी पळ काढला.

या अज्ञात चोरट्यांनी केलेल्या हल्लात जाधव हे गंभीर जखमी झाले असून चोरट्यांनी हा हल्ला घातपाताच्या उदेशाने केला कि आपली चोरी पकडू नये यासाठी केला यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

1,100 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा