दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर, अमेझॉन आणि फेसबुक सारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांनी अलीकडेच कर्मचारी कपात केली आहे. या सर्व टेक कंपन्यांप्रमाणेच आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटही १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. कंपनी जे कर्मचारी कामात कमी पडत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

गुगल परफॉर्मन्स इम्प्रुुव्हमेंट आणि रँकिंग प्लॅन योजना लागू करून सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना कंपनी आखत आहे. नवीन प्रणाली अंतर्गत कंपनी ६ टक्के कर्मचारी काढून टाकणार आहे. या योजनेंंतर्गत गुगलचे व्यवस्थापक कर्मचार्‍यांना रँकिंग देऊन त्यांना बोनस आणि इतर अनुदान देण्यापासून रोखू शकतील. तसेच अल्फाबेटमध्ये सध्या सुमारे १८ लाख ७६ हजार कर्मचारी काम करतात. नोकरी कपात झाल्यास कंपनी नवीन भूमिकांसाठी कर्मचाऱ्यांना अर्ज करण्यासाठी ६० दिवस देणार आहे.